Monday, March 21, 2022

मी वनवासी | पुस्तक समीक्षा

आपण आयुष्य जगताना आपल्या पुढे अनेक अडचणी येतात. त्या अडचणी वर मात करून जगायला हवे. इतरांना आपली गरज आहे तर आपल्याला इतरांची तितकीच गरज आहे. परिस्थितीत कधीच आपल्याला मागे खेचत नाही तर आपण त्या परिस्थितीला बळी पडतो. आपण आपले आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतो. फक्त मनाची संघर्ष करण्याची तयारी हवी. प्रत्येक सजीवांच्या जीवनात संघर्ष हा असतोच. ही संपूर्ण प्रेरणा देणारं एक पुस्तक पद्मश्री पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ अर्थात माईचे आत्मचरित्र मी वनवासी हे पुस्तक वाचन करून मिळाली. तर आजच्या लेखांमधून ह्या पुस्तकाची ओळख पुस्तक समीक्षण लेखन द्वारे बघू. 

             • पुस्तक नाव - मी वनवासी
         
            • लेखिका - सौ. सिंधुताई सपकाळ

            • पब्लिकेशन -  रिया पब्लिकेशन



समीक्षण आशय -
               प्रस्तुत पुस्तक मी वनवासी हे आत्मचरित्र पद्मश्री पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ समाजसेविका सौ. सिंधुताई सपकाळ ह्यांचे आहे. खरंतर हे पुस्तक वाचन करून झाल्यावर मन भावूक होते. माईंचे आयुष्य कसे होते ? त्यांच्या समाजकार्य विषयी माहिती करून घायची असेल ना तर हे आत्मचरित्र नक्कीच एकदा वाचन करा. एका ग्रामीण भागातील एक सामान्य आयुष जगणारी स्त्री च्या वाटेला किती संघर्ष येतो. हे पुस्तक वाचन करताना प्रत्यक्ष ते शब्द डोळ्यांसमोर चित्र उभे करून जाते. समाजातील अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम सुरू केली त्यांची आई झाली त्यांना मातृत्वाचा आधार दिला. हे सर्व तुम्ही ह्या पुस्तकांमध्ये वाचन करू शकता. 
                 मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट तुम्ही सर्वांनी बघितला असेल दृक - श्राव्य पद्धतीने माईचे चरित्र चे चित्रीकरण त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने केले. त्याबद्दल चित्रपट दिग्दर्शक व त्यांच्या संपूर्ण कलाकारांचे व टीम चे खूप कौतुक करतो. व आभार देखील व्यक्त करतो. 
                मी वनवासी हे माईचे आत्मचरित्र सर्वांनी नक्की वाचन करा. चित्रपट मध्ये कालावधी मर्यादा ३ तास असते. त्यामुळे एकदम सर्वच चरित्र चित्रीकरण करू शकत नाही. म्हणून हे पुस्तक वाचन करा. आपण पुस्तक वाचन करू लागू तसेच आपल्या समोर प्रत्यक्ष चित्र उभे राहते. पुस्तक हे जास्त मोठे नाही माध्यम स्वरूपाचे आहे. एकदा नक्की वाचन करा आणि तुम्हाला हा समीक्षण लेख कसा वाटला तो टिप्पणी ( Comment ) द्वारे नक्की कळवा.

No comments:

Post a Comment