पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव - नेचर्स हुमन फिलॉसॉफी
लेखक - अश्विन बी. शाह
पब्लिकेशन - रिया पब्लिकेशन
समीक्षण आशय -
प्रस्तुत नेचर्स हुमन फिलॉसॉफी ह्या पुस्तकाचे लेखक अशिवन. बी. शाह ह्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी अगदीच सोप्या शब्दात मानवी जीवन विषयक तत्वज्ञान मांडले.
नेचर्स हुमन फिलॉसॉफी ह्या पुस्तकांमधून मला भरपुर माहिती वाचन करायला मिळाली. एखाद्या मानवी जीव च्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे व निसर्ग संबंध हे ह्या पुस्तकातून आकलन होते. आपला स्वभाव, वाईट व चांगले गुण मूल्यांकन व निसर्ग संबंध त्याच प्रमाणे जीवन मानवी धर्म काय असतो ते चांगल्या पद्धतीने कळते. प्रत्येकाने एकदा तरी हे पुस्तक नक्की वाचन करावे असे मला वाटते. तुमच्या मनात एक प्रश्न नक्की येत असेल की तत्वज्ञान स्वरूपाचे पुस्तक हे छोटे नसून मोठे असेल जास्त पानांचे असेल तर तसे काही नाही हे माध्यम स्वरूपाचे पुस्तक आहे. एकदा प्रत्यक्षात बघा पुस्तकाच्या प्रारंभी अनुक्रमणिका आहे त्यामध्ये पुस्तकाच्या अंतर्गत स्वरूप काय आहे हे तुम्हाला कळेल. ते शेवटी म्हणजे पुस्तकाच्या मागच्या बाजूला थोडक्यात लेखकांचे पुस्तकाविषयी सांगितले आहे. ते नक्की वाचन करा.
पुस्तक वाचन करताना तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल तो असा की प्रत्यक्षात आपण जे जीवन जगतो ना त्याविषयी पुस्तकांमध्ये सांगितले आहे. तर ते शब्द वाचन करताना तुम्हाला असे वाटले की ही प्रत्यक्षात आहे. हे असे असते का ? व का असते असे ? असे प्रश्न येतील तुम्ही त्यापद्दतीने शोध घ्यायला सुरुवात कराल. त्याविषयी माहिती अभ्यास करणार अनेक बदल हे पुस्तक तुमच्यात नक्की घडवेल. मला एक प्रश्न आहे तो ह्या पुस्तकाच्या शीर्षक विषयी पुस्तक हे मराठी भाषेतील आहे. अनुवाद केलेले पण नाही तर मग इंग्रजी भाषेत शीर्षक का बरं हा प्रश्न मला आज ही पुस्तक बघितले की मनात येतो. तुम्हाला काय वाटते. इंग्रजी भाषेत का आहे ? हे टिप्पणी (Comment ) द्वारे नक्की सांगा.
माझी तुम्हाला विनंती आहे की हे पुस्तक नक्की वाचन करा. व तुमचा अनुभव आपल्या ब्लॉग च्या टिप्पणी (Comment ) द्वारे सांगा. हे पुस्तक तुम्हाला online पाहिजे असेल तर book Ganga .com मध्ये मराठी पुस्तक आहे व Amazon मध्ये हिंदी. भाषेत आहे.
No comments:
Post a Comment