Tuesday, March 29, 2022

त्यांना सावलीत वाढवू नका ! | पुस्तक समीक्षा

आपल्याला नेहमी सांगितलं जाते की आपल्या पेक्षा मोठ्यांच म्हणणे ऐकावे. त्यांच्या शब्दांचा मान ठेवावा असे सल्लात्मक बोलणे आपण ऐकले असेल. तर दवाखान्यात जेव्हां वैद्य आपल्या शरीरातील रोगांचे निदान करतो. तेंव्हा त्यांचा आपल्या शरीरासाठी उपचारात्मक सल्ला असतो. जीवनात असे अनेक व्यक्तींचे सल्लात्मक बोलणे महत्वपूर्ण असतात. तर आजच्या समीक्षा लेखा मध्ये अश्याच एका पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. 


    • पुस्तकाचे नाव - त्यांना सावलीत वाढवू नका ! 

    • लेखकाचे नाव - डॉ. आ. ह. साळुंखे

    • पब्लिकेशन - लोकायत प्रकाशन 

समीक्षण आशय - 
       प्रस्तुत पुस्तकाची समीक्षा सुरू करण्यापूर्वी हे पुस्तक माझ्याकडे कसे आले व कोणी दिले ह्याविषयी थोडक्यात सांगतो. मी वर्ग 12 वी कला शाखेचा विद्यार्थी होतो. आम्हाला मराठी विषय अध्यापन करणारे प्रा. कांबळे सर ह्यांना साहित्याची खूप माहिती होती व आवड देखील होती. तर निरोप समारंभ च्या दिवशी त्यांनी हे पुस्तक मला भेट म्हणून दिले. 
        त्यांना सावलीत वाढवू नका ! हे पुस्तक मला खूप आवडले. कारण पुस्तक रुंदी कमी आहे. व कमी शब्दांत जास्त माहिती वाचन करायला मिळते. लेखकांनी ह्या पुस्तकांत एखाद्या विषय मांडताना तत्कालिन जीवन किंवा त्यांचे अनुभव सोबत माहिती सादर केली आहे. हे पुस्तक बाह्य अंगाने बघितले तर पुस्तक शीर्षक प्रमाणे एक झाडांची फांटी चित्र दाखवले आहे. त्याचप्रमाणे मागील बाजूस एक छोटी प्रस्तावना वाचन करायला मिळते. 
            सल्लात्मक लेखन स्वरूपातील आशय मला ह्या पुस्तकात वाचन करायला मिळाला. म्हणजेच सल्लात्मक लेखन आहे असे मला वाटले. कारण एक प्रकारे मार्गदर्शक बोल ह्या पुस्तकात वाचन करायला मिळाली आहे. हे पुस्तक सर्वांनी वाचन करा. प्रेरणादायक लेख वाचन करायला मिळतात. तेही अगदीच सोप्या शब्दांत सोप्या भाषेत वाचन करायला मिळते.

Wednesday, March 23, 2022

वाचन व शब्दवृध्दी

शब्द ही संकल्पना सर्वच भाषेत बघायला मिळते. खरंतर भाषा वापर करण्याचे साधन म्हणजेच शब्द होय. साहित्य वाचन करताना त्यामधील मजकूर हा शब्दाने तयार होतो. व नंतर तो मजकूर आपण वाचन करतो. वाचन हे शब्द ओळख झाली की नंतर ची प्रक्रिया आहे. एखादे साहित्य हे वाचन केले जाते व लिहले देखील जाते. हे सर्वांच्या परिचयाचे आहे. ह्या मध्ये मुख्य असते ते शब्द. तर आजच्या लेखांमध्ये वाचन व शब्दवृद्धी ह्या विषयी थोडक्यात अभ्यासु. 

वाचन - 
       शब्दओळख झाली की म्हणजेच शब्दाचे उच्चार करता आले की वाचन चांगल्या प्रकारे करता येते. तेवढेच नाही तर ज्या भाषेचे साहित्य वाचन करतो. त्या भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. मुख्य म्हणजे व्याकरण हे परिपक्व असणे देखील महत्वाचे असते. तेव्हाच नीट उच्चारण होते. व वाचन देखील चांगल्या प्रकारे होते. 

शब्द - 
         प्रत्येक भाषेला लिपी असते. आपल्या मराठी भाषेची देवनागरी लिपी आहे. ही लिपी आपल्या मराठी भाषेबरोबर अनेक भाषेची आहे. जसे की हिंदी, संस्कृत व मराठी ह्यांसारख्या अनेक भाषेची लिपी ही देवनागरी आहे. लिपीनुसार शब्द असतात. व शब्दानुसार उच्चार असतो. अशी शृंखला असते. एक प्रकारची साखळी असते. अश्या प्रकारे शब्द असतात. अनेक शब्द मिळून एक लेख होतो. एक साहित्य देखील लिहिले जाते. 

वाचन व शब्दवृध्दी - 
              आपण एखादे साहित्य वाचन करतो. म्हणजेच एखादे पुस्तक वाचन करतो. ते पुस्तक एखाद्या लेखकाने लिहलेले असेल किंवा मग माहिती देणारे एखादे शैक्षणिक संदर्भ पुस्तक असेल. ते पुस्तक आपण वाचन करतो. त्यामधून अनेक नवनवीन माहित मिळते. नवनवीन शब्द वाचन करायला मिळतात. आपण असे अनेक साहित्य वाचन केले असता आपल्याला एक नवीन बदल आपल्या बोलण्यात संवादात जाणवतो. तो म्हणजे आपण इतरांपेक्षा थोडे वेगळे शब्द वाचन करतो. म्हणजे नेमकं काय होतं ? तर आपल्या बोलण्यातील भाषेत बदल होतो. शब्द साठा वाढतो. शब्द मर्यादा वाढते. हा बदल फक्त वाचन केल्याने होते. हे मात्र निश्चित आहे. कारण हा माझा स्वतः चा अनुभव आहे.            

Tuesday, March 22, 2022

हां ये मुमुकिन हैं | पुस्तक समीक्षा

आपले आरोग्य कधी कधी निसर्ग बदलामुळे होणारे वातावरण बदल किंवा अस्वच्छता असेल त्यामुळे त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. तेव्हा आपण डॉक्टर कडे उपचार करिता जातो. त्यांच्या कडून आरोग्याची तपासणी करून घेतो. डॉक्टर म्हणजेच आपल्या मराठी मध्ये वैद्य किंवा आरोग्य चिकित्सक असे पर्यायी शब्द आहे. रुग्णांची सेवा करणे त्यांच्या आरोग्याविषयी सल्ला देणे, निदान करणे अशी त्यांच्या कार्याची ओळख आहे. तर आजच्या लेखांमध्ये हां ये मुमकिन है हे पुस्तकांमधून एका महिला डॉक्टर ची संघर्ष कथा त्यांच्याच शब्दांत एका पुस्तकांमधून आपल्याला वाचन करायला मिळणार आहे. तर पुस्तकाविषयी पुस्तक समीक्षा ह्या लेखांमधून माहिती बघू. 

            • पुस्तकाचे नाव - हां ये मुमकीन है ! 

            • लेखक - डॉ. तरू जिंदल 

            • अनुवादक - रमा हर्डीकर

            • पब्लिकेशन - रोहन पब्लिकेशन 

समीक्षण आशय - 
           प्रस्तुत पुस्तकाची समीक्षा सुरू करण्यापूर्वी हां ये मुमिकन है ! ह्या पुस्तकाचे अनुवादक रमा हर्डीकर ह्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी हे पुस्तक मराठी वाचकांसाठी मराठी भाषेत अनुवाद केले. त्यामूळे ते माझ्या बरोबर अनेक मराठी वाचकांना वाचन करण्याकरिता मिळाले. डॉ. तरू जिंदल ह्यांच्या विषयी त्यांच्या कार्य व संघर्षा विषयी माहिती मिळाली. 
            मुंबई ते बिहार मधील एका छोट्या ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालय पर्यंत चा तरू जिंदल यांचा प्रवास ह्या पुस्तकात वाचन करायला मिळाला. बिहार मधले एक ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालय कशी आहेत त्या विषयी माहिती होते. डॉ. तरू जिंदल येण्या अगोदर व आल्यानंतर तेथील व्यवस्था कशी बदलली हे वाचन करायला मिळाले. रुग्णालय चे चित्र देखील पुस्तक मध्ये समाविष्ट केलेले आहेत. डॉ. तरू जिंदल ह्यांच्या कर्यांविषयी व संघर्ष विषयी खूप माहिती ह्या पुस्तकांमधून मिळाली. त्याच प्रमाणे एक डॉक्टर च्या कार्याविषयी माहिती होते. 
                 डॉ. तरू जिंदल ह्यांचे हां ये मुमकीन है ! हे पुस्तक सर्वांनी नक्कीच वाचन करा. ज्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. किंवा वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील. त्यांनी नक्कीच वाचन करा. एक प्रेरणा मिळते. तेव्हा सर्वांनी नक्कीच वाचन करा. तुम्हाला हा समीक्षाण लेख कसा वाटला तो टिप्पणी (Comment) द्वारे नक्की कळवा. 

Monday, March 21, 2022

मी वनवासी | पुस्तक समीक्षा

आपण आयुष्य जगताना आपल्या पुढे अनेक अडचणी येतात. त्या अडचणी वर मात करून जगायला हवे. इतरांना आपली गरज आहे तर आपल्याला इतरांची तितकीच गरज आहे. परिस्थितीत कधीच आपल्याला मागे खेचत नाही तर आपण त्या परिस्थितीला बळी पडतो. आपण आपले आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतो. फक्त मनाची संघर्ष करण्याची तयारी हवी. प्रत्येक सजीवांच्या जीवनात संघर्ष हा असतोच. ही संपूर्ण प्रेरणा देणारं एक पुस्तक पद्मश्री पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ अर्थात माईचे आत्मचरित्र मी वनवासी हे पुस्तक वाचन करून मिळाली. तर आजच्या लेखांमधून ह्या पुस्तकाची ओळख पुस्तक समीक्षण लेखन द्वारे बघू. 

             • पुस्तक नाव - मी वनवासी
         
            • लेखिका - सौ. सिंधुताई सपकाळ

            • पब्लिकेशन -  रिया पब्लिकेशन



समीक्षण आशय -
               प्रस्तुत पुस्तक मी वनवासी हे आत्मचरित्र पद्मश्री पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ समाजसेविका सौ. सिंधुताई सपकाळ ह्यांचे आहे. खरंतर हे पुस्तक वाचन करून झाल्यावर मन भावूक होते. माईंचे आयुष्य कसे होते ? त्यांच्या समाजकार्य विषयी माहिती करून घायची असेल ना तर हे आत्मचरित्र नक्कीच एकदा वाचन करा. एका ग्रामीण भागातील एक सामान्य आयुष जगणारी स्त्री च्या वाटेला किती संघर्ष येतो. हे पुस्तक वाचन करताना प्रत्यक्ष ते शब्द डोळ्यांसमोर चित्र उभे करून जाते. समाजातील अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम सुरू केली त्यांची आई झाली त्यांना मातृत्वाचा आधार दिला. हे सर्व तुम्ही ह्या पुस्तकांमध्ये वाचन करू शकता. 
                 मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट तुम्ही सर्वांनी बघितला असेल दृक - श्राव्य पद्धतीने माईचे चरित्र चे चित्रीकरण त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने केले. त्याबद्दल चित्रपट दिग्दर्शक व त्यांच्या संपूर्ण कलाकारांचे व टीम चे खूप कौतुक करतो. व आभार देखील व्यक्त करतो. 
                मी वनवासी हे माईचे आत्मचरित्र सर्वांनी नक्की वाचन करा. चित्रपट मध्ये कालावधी मर्यादा ३ तास असते. त्यामुळे एकदम सर्वच चरित्र चित्रीकरण करू शकत नाही. म्हणून हे पुस्तक वाचन करा. आपण पुस्तक वाचन करू लागू तसेच आपल्या समोर प्रत्यक्ष चित्र उभे राहते. पुस्तक हे जास्त मोठे नाही माध्यम स्वरूपाचे आहे. एकदा नक्की वाचन करा आणि तुम्हाला हा समीक्षण लेख कसा वाटला तो टिप्पणी ( Comment ) द्वारे नक्की कळवा.

Saturday, March 19, 2022

नेचर्स हुमन फिलॉसॉफी | पुस्तक समीक्षा

सजीव सृष्टी चा निसर्गाशी संबंध अतूट आहे. असं म्हणतात किंवा आपण कधी कधी ऐकले देखील असेल. निसर्ग ही एक व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. असे बरेच काही निसर्ग विषयी सांगतात. निसर्ग वातावरण बदल झाला असेल तर आपल्या आरोग्यात बदल होतो. थोडक्यात सर्दी होते. आपल्या मानवी जीवनाचा व निसर्गाशी संबंध हा अतूट स्वरुपाचा आहे. तर सजीव सृष्टी मध्ये सर्वात बुद्धिमान जीव म्हणून मानव जीव ना प्राधान्य देण्यात येते. आपल्या मानवी जीवनाची अशी तत्वज्ञान शाखा आहे. तशाच स्वरूपाचे एक पुस्तक आजच्या समीक्षण लेखाद्वारे अभ्यासनार आहोत. त्याविषयी समीक्षण स्वरूपात माहिती बघणार आहोत.

पुस्तक परिचय 

         पुस्तकाचे नाव - नेचर्स हुमन फिलॉसॉफी

         लेखक - अश्विन बी. शाह 

         पब्लिकेशन - रिया पब्लिकेशन 


समीक्षण आशय - 
            प्रस्तुत नेचर्स हुमन फिलॉसॉफी ह्या पुस्तकाचे लेखक अशिवन. बी. शाह ह्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी अगदीच सोप्या शब्दात मानवी जीवन विषयक तत्वज्ञान मांडले. 
             नेचर्स हुमन फिलॉसॉफी ह्या पुस्तकांमधून मला भरपुर माहिती वाचन करायला मिळाली. एखाद्या मानवी जीव च्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे व निसर्ग संबंध हे ह्या पुस्तकातून आकलन होते. आपला स्वभाव, वाईट व चांगले गुण मूल्यांकन व निसर्ग संबंध त्याच प्रमाणे जीवन मानवी धर्म काय असतो ते चांगल्या पद्धतीने कळते. प्रत्येकाने एकदा तरी हे पुस्तक नक्की वाचन करावे असे मला वाटते. तुमच्या मनात एक प्रश्न नक्की येत असेल की तत्वज्ञान स्वरूपाचे पुस्तक हे छोटे नसून मोठे असेल जास्त पानांचे असेल तर तसे काही नाही हे माध्यम स्वरूपाचे पुस्तक आहे. एकदा प्रत्यक्षात बघा पुस्तकाच्या प्रारंभी अनुक्रमणिका आहे त्यामध्ये पुस्तकाच्या अंतर्गत स्वरूप काय आहे हे तुम्हाला कळेल. ते शेवटी म्हणजे पुस्तकाच्या मागच्या बाजूला थोडक्यात लेखकांचे पुस्तकाविषयी सांगितले आहे. ते नक्की वाचन करा. 
              पुस्तक वाचन करताना तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल तो असा की प्रत्यक्षात आपण जे जीवन जगतो ना त्याविषयी पुस्तकांमध्ये सांगितले आहे. तर ते शब्द वाचन करताना तुम्हाला असे वाटले की ही प्रत्यक्षात आहे. हे असे असते का ? व का असते असे ? असे प्रश्न येतील तुम्ही त्यापद्दतीने शोध घ्यायला सुरुवात कराल. त्याविषयी माहिती अभ्यास करणार अनेक बदल हे पुस्तक तुमच्यात नक्की घडवेल. मला एक प्रश्न आहे तो ह्या पुस्तकाच्या शीर्षक विषयी पुस्तक हे मराठी भाषेतील आहे. अनुवाद केलेले पण नाही तर मग इंग्रजी भाषेत शीर्षक का बरं हा प्रश्न मला आज ही पुस्तक बघितले की मनात येतो. तुम्हाला काय वाटते. इंग्रजी भाषेत का आहे ? हे टिप्पणी (Comment ) द्वारे नक्की सांगा. 

    माझी तुम्हाला विनंती आहे की हे पुस्तक नक्की वाचन करा. व तुमचा अनुभव आपल्या ब्लॉग च्या टिप्पणी (Comment )  द्वारे सांगा.  हे पुस्तक तुम्हाला online पाहिजे असेल तर book Ganga .com मध्ये मराठी पुस्तक आहे व Amazon मध्ये हिंदी. भाषेत आहे.

Thursday, March 17, 2022

तुका राम दास | पुस्तक समीक्षा

आपल्या वाणीतून, आचरणातून, शब्दातून समाज प्रबोधन करणे, उपदेश देणे अशी संतांची ओळख. आपल्या महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतामध्ये संत परंपरा लाभली आहे. भजन, कीर्तन व अभंग ह्या मधून समाजाला जागृत करणे. आपल्या महाराष्ट्रातील संत परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पासून सुरू झाली. त्यानंतर ही परंपरा अखंड पणे सुरु राहिली. आजच्या लेख मध्ये असेच संत तुकाराम महाराज व संत तुकाराम महाराज ह्यांच्या अभंग विषयी माहिती सांगणारे असे पुस्तक विषयी माहिती बघणार आहोत.

समीक्षण आशय - 
          प्रस्तुत पुस्तक हे संत तुकाराम महाराज व संत रामदास महाराज ह्यांच्या अभंगाचे विश्लेषण करणारे एक पुस्तक आहे. ह्यामध्ये एखादा अभंग काय म्हणतो हे उदाहरण स्वरूप सांगण्यात आला. म्हणजेच अभंगाचे विश्लेषण हे उदाहरण स्वरूप केले त्यामुळे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजले आकलन झाले. पुस्तक जेव्हा हातात घेतले तेव्हा सर्वात आकर्षक होते. ते पुस्तकाचे समोरील पृष्ठभाग वरील चित्र त्याच्या पाश्र्वभूमीवर तत्कालीन अभंग व त्याची लिपी होती. त्यामुळे ते समोरील पृष्ठभाग अधिक चांगल्या पद्धतीने पुस्तकाची ओळख सांगत होते. 
  
         पुस्तकाच्या आतील रचना ही खूप चांगल्या पद्धतीने मांडली. पहिले संत तुकाराम महाराज ह्यांचे अभंग व नंतर संत रामदास महाराज ह्यांचे अभंग अशी अंतर्गत स्वरूप पुस्तकाचे आहे. हे पुस्तक लोकसत्ता ह्या वृत्तपत्र संस्थेचे आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या पुस्तकाची रचना केली व अंतर्गत रचना म्हणजे काही मुख्य अभंग मांडणी केली. त्याबद्दल लोकसत्ता वृत्तपत्र संस्थेचे आभार मानतो. 
            तुका राम दास हे पुस्तक सर्वांनी वाचन करावे. आजच्या काळात ज्यास्त कोणी कीर्तन व भजन कडे लक्ष देत नाही. किंवा काहींना वेळ मिळत नसेल तर त्यांच्या करिता हे पुस्तक एक ज्ञान संजीवन आहे. हे पुस्तक दोन थोर संताचे अभंग त्यांनी दिलेला संदेश सांगणारे हे पुस्तक आहे. तेव्हा नक्की वाचन करा. कृपया एक छोटी टिप्पणी (comment ) नक्की करा की ही समीक्षा तुम्हाला कशी वाटली. 
.

Tuesday, March 15, 2022

भारतीय शिल्पवैभव प्राचीन - मध्ययुगीन | पुस्तक समीक्षा

प्राचीन व मध्ययुगीन काळात अनेक प्रकारचे वास्तू निर्माण झाल्या. स्थापत्यशास्त्र, वास्तुशास्त्र व शिल्पशास्त्र असे अनेक प्रकारचे शास्त्र अभ्यासून हे त्या वास्तू निर्माण केल्या गेल्या होत्या. आज जर त्या वास्तूंना भेट दिली असता ते कश्या निर्माण झाल्या असतील हे आपल्याला कळते. मुख्य म्हणजे प्राचीन काळात निर्माण केली गेलेली एक वास्तू प्रत्यक्ष समोर बघितली त्या वास्तूला भेट तर एक प्रश्न तर नक्की मनात येतो की आज पण ही वास्तू जशीच्या तशी स्वतः चे अस्तित्व कशी  टिकून आहे ? हा नक्कीच येईल. तर आजच्या लेखामध्ये आपण एका पुस्तकाची समीक्षा वाचन करत आहे. म्हणजेच त्या पुस्तकाची ओळख करून घेत आहोत. 

पुस्तकं परिचय - 
          
           • पुस्तक नाव - भारतीय शिल्पवैभव प्राचीन - मध्ययुगीन 
               
           • लेखक -  डॉ. सुरेश रघुनाथ देशपांडे 
     
           • पब्लिकेशन - मेहता पब्लिकेशन हाऊस. 


                                                   

समीक्षण आशय - 
              भारतीय शिल्पवैभव प्राचीन -  मध्ययुगीन हे पुस्तक आपल्या भारतातील महत्त्वाच्या वास्तू विषयी माहिती सांगणारे एक पुस्तक आहे. ह्या मध्ये एखाद्या वास्तू विषयी माहिती सांगताना प्रथमतः त्याची निर्मिती कधी झाली, त्या वास्तू विषयी महत्वाची माहिती सांगितली. तर मला खूप आवडली. वाचन करताना असे वाटत होते की आपल्या समोर ती वास्तू अप्रत्यक्ष लिखित स्वरूपात माहिती सांगत आहे. प्रत्यक्ष पुस्तक लहान वाटेल पण जेव्हा वाचन कराल ना तेव्हा खूप मोठे असे जाणवेल. ते कश्या मुळे तर त्यातील महत्वाचा आशय लेखकांनी खूप सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. आपण त्या पुस्तकातील एखाद्या वास्तूचे वाचन केले असेल तर त्या वस्तू संबंधी अधिक माहिती वाचन कराल. 
               पुस्तकांमध्ये शेवटी वास्तू वरील शिल्प चे चित्र दाखवले आहे. माझ्या मते असे वाटते की जे चित्र पुस्तकाच्या शेवटी होती ते चित्र पुस्तकांमध्ये संबंधीत वास्तू विषयी माहिती सांगताना त्या वास्तू विषयी माहीत लेख शेवटी चित्र दर्शावावे त्याने काय होईल तर आपण वाचन केलेली वास्तू प्रत्यक्ष कशी असेल त्या वास्तू वरील शिल्प कसे असेल हे वाचकांना लवकर आकलन होईल. हे पुस्तक प्राचीन व मध्ययुगीन काळात निर्माण झालेल्या वास्तू विषयी खूप सुंदर पद्धतीने माहीती सांगणारे पुस्तक आहे. 

तुम्हाला हा पुस्तक विषयी समीक्षा कशी वाटली हे एक टिप्पणी ( Comment ) द्वारे नक्की सांगा ! 

Tuesday, February 22, 2022

पुस्तक समीक्षा म्हणजे काय ?

एखादे पुस्तक वाचन करून त्या पुस्तकातील निष्कर्ष आपल्या शब्दात मांडणे एक प्रकारे मूल्यमापन करणे म्हणजे पुस्तक समीक्षा होय. आपल्याला आवडलेले कोणतेही पुस्तक असो त्याबद्दल आपले मत व्यक्त करणे वाचन करून त्यामधील वैशिष्ट्ये लिखित स्वरूपात सांगणे म्हणजे समीक्षा होय. 

पुस्तक समीक्षा म्हणजे काय ? 
             मी एखादे पुस्तक वाचन केले आहे. ते पुस्तक व्यक्तिगत खूप आवडले. त्यातील महत्वपूर्ण असा भाग मला आवडला व त्यामुळे पुस्तक देखील मला आवडले आहे. त्या पुस्तकबरोबर पुस्तकाचे लेखक मला त्यांची अजून बरेच पुस्तक वाचनाची इच्छा झाली हे सर्व मी लिखित स्वरुपात लिहून ठेवले. व ते माझ्या मित्र मंडळीना खूप आवडली व त्यांनी सुध्दा हे पुस्तक वाचणार असं मत व्यक्त केलं. 
                  संपूर्ण पुस्तक वाचन झाल्यानंतर मी त्यामधील मला आवडलेल्या काही छोटी - मोठी निष्कर्ष एका कागदावर मांडली. त्यामुळे माझ्या वाचक मित्रांना ते पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली. त्यास पुस्तक पुस्तक समीक्षा असे म्हणतात.  

                                                         

पुस्तक समीक्षेचे प्रकार कोणते ? 
          १) साहित्य समीक्षा
          २) कलावादी समीक्षा 
          ३) काव्यात्मक समीक्षा 
          ४) पर्यावरणवादी समीक्षा 
          ५) भाषाशास्त्र समीक्षा 
          ६) मानसशास्त्र समीक्षा
          ७) समाजशास्त्र समीक्षा
          ८) संगीत समीक्षा 
          ९) सौंदर्यवादी समीक्षा 
        १०) आस्वादक समीक्षा  

असे काही मुख्य सामिक्षेचे प्रकार आहेत. 
                 

Monday, February 21, 2022

साहित्य निर्मिती

मनातील विचार प्रकटीकरण कल्पना सादरीकरण, भावना व्यक्त करणे, आपले अनुभव लिखित स्वरूपात सांगणे, एखादे गीत व्यक्त करणे. म्हणजेच भाषेचा आधार घेऊन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लिखित किंवा मौखिक स्वरूपात अभिव्यक्त होणे म्हणजे साहित्य निर्मिती होणे होय. एखादे लिखित पुस्तक असेल किंवा गायलेलं गीत असेल ते देखील साहित्य म्हणून ओळखले जाऊ शकते. 


साहित्याची निर्मिती कशी होते ? 
        साहित्य निर्मिती होण्याकरिता आपल्या मनातील कल्पना शक्ती व शब्द संपदा च्या द्वारे एखादे साहित्य निर्माण केले जाऊ शकते. साहित्य निर्मिती हे काही महत्त्वाच्या घटक द्वारे होते. ते मूलभूत घटक साहित्य निर्मित करताना आवश्यक असतात. 

  १) कल्पनाशक्ती - एखादे पुस्तक लिखाण करताना आपण सर्वप्रथम एक कल्पना लक्षात घेऊन लिखाण करतो. साहित्यामधील कल्पनाशक्ती कशी असते. तर एखादी कादंबरी वाचन केले किंवा कोणतेही कथेचे पुस्तक वाचन केले तर त्यातील विषय हा काल्पनिक स्वरूपाचा असतो. 

   २)  भावनात्मक - एखादे पुस्तक वाचन करताना आपल्याला भावनिकता जाणवते. त्या पुस्तकांमधील काही लिखित प्रसंगपैकी काही प्रसंग हे भावनिक वाटतात. अश्या प्रकारे साहित्य मध्ये भावनिकता जाणवते.  

                                               

    ३) प्रतिभा - एखादे पुस्तक वाचन करताना आपल्याला त्यातील पात्र हे खरे असल्या सारखे वाटतात. तर ती सहित्यमधील प्रतिभा असते. जी वाचकाला पुस्तक वाचन करताना खरेच असल्याचा अनुभूती देऊन जाते. 

    ४) विपूनन्नता - एक साहित्य निर्मिती करणारा सर्व प्रकारे विपूनन्न असावा. म्हणजेच शब्द संपदा, व साहित्य निर्मिती चे घटक ह्या प्रकारात विपूनन्न असावा. 

    ५) स्फूर्ती 
   
    ६) उत्प्रेक्षा 

वरील सहा घटक साहित्य निर्मिती करताना महत्वपूर्ण असतात.